बदलापुर बारवी डॅम , जंगल सफारी
मुंबई पासुन अगदी जवळ पण निसर्गाच्या वेढ्यात वसलेल पण आधुनिकता आणि परंपराना जपणारे असे हे शहर.
खुप दिवस झाले होते ऑफिस लाइफ मधून बाहेर पडून कुठे तरी बाहेर जायचं होतं, पण मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो कारण सुट्टीचा प्रष्ण होता मग एका दिवसात जाऊन येयचं होतं म्हणून मग जवळ पास कुठे जायचं ते पाहत होतो, मग एके दिवशी गूगल वर असच पाहिलं तर बदलापुर जवळ एक डॅम आहे हे कळलं त्याच बरोबर तिथे जंगल सफारी सुध्दा आहे हे समजल्यावर तर जायचं नक्की झालं. मग काय शनिवार ठरला आणि सगळी तैयारी झाली मग मी आणि माझा मित्र दोघांनी जाऊन येयचं ठरलं तसंच केलं अणि २ च्या सुमारास आम्ही डोंबिवली वरुन बदलापुर ला कोच केला.
त्या नंतर आम्ही डोंबिवली बदलापुर रोड ला आलो , हवामान खुप छान होतं. पावसाचं वातावरण असल्यामुळे गाडी चालवायला खुप मजा येत होती ,
रस्ता शोधत शोधत आम्ही डॅमच्या रोड ला लागलो, मग काय वातावरण आणि त्यात हा सुंदर असा नागमोडा रस्ता गाडी चालवता चालवता आम्ही हरउन गेलो होतो आणि हा रस्ता कधी संपू नये असं वाटत होतं. आम्ही दोघं पण त्या महिन्या भरातला ऑफिस चा थकवा विसरून गेलो होतो आणि त्या वातावरणात हरऊन बसलो.
त्या नंतर डॅम ला पोहोचलो. आमचा दोघांचा पण डॅम पाहण्याची ही पहिलिच वेळ. डॅम असतो काय हे आम्हाला तिथे गेल्या वरंच कळलं. मग काय मनसोक्त त्या कडे पाहत बसलो अणि पुढे जंगल सफारी ला निघालो.
खुप मस्त अनुभव होता शब्दात न मांडता येणारा, काही जणांना हा अनुभव एवढा मजेशीर वाटणार नाही , पण आमच्या साठी तो खुप मोठा होता कारण वर्ष भर आम्ही ऑफिस ते घर एवढीच लाइफ असल्या मुळे खुप दिवसाचा कंटाळा आणि ऑफिसचा त्रास या पासून थोडा मनाचा विरंगुळा अणि मानसिक शांतता दोन्ही पण आम्हाला मिळाली म्हणून आता सोमवार पासून थोडा नविन बदल जाणवतील आमच्या मध्ये ,
थोडा वेळ आम्ही तिथे काढला आणि परती ला निघालो पण आमचा हा अनुभव आमच्या साठी खुप महत्वाचा होता ,
तुम्ही पण अनुभव घ्या आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा।