Thursday, 18 August 2016

                                                                     * लोहगड*


लोहगड माझी पहिली पावसाळी सहल , पावसाळी सहली साठी मी खूप दिवसा पासून तयारी करत होतो ,
त्या नुसार तयारी करत सुधा होतो पण कुठे जायच ते ठरत नवत , पण काहीच दिवसात अनिकेत देशमुख नावाचा माझा कॉलेज मित्राने माला फोन केला अणि लोहगड  ला जायचा प्लान केला अणि मि पटकन हो बोललो , त्यानुसार  रविवारी जायचा ठरला अणि सकाळी कल्याण मधे सगळे कॉलेज मित्र भेटलो अणि इंद्रायणी पकड़ायची ठरविली त्या नुसार सकाळी ६. ५० ला गाडी असल्या मुले आम्ही ६. ३० सकाळी भेटलो ,

आरक्षित दब्बायाची टिकट काढल्या नसल्याने आम्ही सामान्य डब्बा पकडायचा ठरवले पण  जाशी गाड़ी अली ताशी एकदम गर्दी वाढली अणि मि अणि माझे मित्र गाडीत चढायच प्रयत्न करात होतो पण कसला काय कोणालाच चढ़ाता अला नही म्हणून नुसती धावा धाव मग मगे डब्बा रिकामे दिसले तर तिकडे धवलो , अणि कसे बबसे  भानडा  भड़ी करून आम्ही त्या डब्ब्यात चढलो  मग काय गाडी निघाली अणि मुंबई दुर जाऊ लागली अणि निसर्गाचे विविध रूप दिसाला लागली , जस कर्जत सुटला अणि गाडीतून दिसणाऱ्या निसर्गाच्या विविध छटा आम्हाला सगळ्यांना रविवारची सुट्टी वाया नहीं गेली याचा अनुभव आला।
                         लोणावळा ला उतरून पुढे   मळवली  स्थानक गाठले तिथुन पुढे चालत जायच ठरल जाताना वाटेत ४-५ धबधबे लगले  आम्ही त्यात उतारण्याचा मोह आवरला अणि पुढे निघालो , अणि रिमझिम पावसाळ्यात आम्ही डोंगरात उतारलेले ढग आम्हाला लोहागढ़ कड़े जाण्याचा मोहा मधे  खत पाणी घालत  होते।
                        अमच्यातले सगळ्यांचा आत लपलेला फोटोग्राफर जगा झाला अणि रिमझिम पावसात मोबाइल, क्यामेरा काढत आम्ही निसर्गाच्या  विविध छटा आमच्या क्यामेरा मधे टिपले।
             गड़ा वरती जाताना धुक्या मुळे पायऱ्यांचा अंदाज येत नव्हता।  पण गड़ा वरती जाण्याची ओढ आम्हाला बळ देत होती।  ३० मिंटाची चढ चढून आम्ही गडावर पोहचलो अणि वर गेल्यावर लक्षात अला की आम्ही  केलेली मेहनत वाया गेली नही   ते निसर्गाचा देखण रूप आम्हाला कदाचितच कुठे बघाला मिळाला असत।  खुप धुक़  अणि खुप वारा असल्याने आम्हाला सगळे ठिकाणे पाहता नही मिळाली   पण जेवढी  पहिली तेवढ्यानेच आमचे पोट भरले ।  आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो।  खली उतरलो अणि परत चालतच  माळवली स्टेशन कडे निघालो ,पण  परत जाताना वाटेत पहिलेल धबधबे आम्हाला परत खुणावत होते मग काय उतरलो अणि मनसोक्त भिजलो , अणि लोहागढ़ च्या आठवणी घेऊन निघालो , जाताना एका घराच्या आडोशाला उभा राहुल कपडे बदले , अणि लोनावला साठी गाड़ी पकडली ,  लोणावळ्याला उतरल्या नंतर आम्ही एकमेकांना शोधाला लगालो , लोकल गाड्याचा गर्दी मुळे  आम्ही सगळे वेगळे झालो ,१५मिन च्या शोध कार्या नंतर आम्ही सगळे भेटलो अणि सिंहगड गाड़ी पकडली , गाडीत चढताना काही लोकन  बरोबरआमची  वादा वादी झाली  , मग कस बस करून सगळे शांत झालो अणि मग काहीच वेळात ते सुधा आमच्या बरोबर गप्पा माराला लागले कल्याण स्टेशन आल अणि  सगळे एक मेकानचा निरोप घेऊन आम्ही घरी पोहचलो।  

         अणि मग लोहागढ़ च्या आठवणी मधे रात्रि कधी ज़ोपलो ते काळलच नही  


कसे जायचे :
पूण्यावरून अथवा मुंबईवरून:- 
पूण्यावरून अथवा मुंबईवरून  येतांना लोणावळ्याच्या पुढे असणार्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतरगायमुखखिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.


२ लोणावळ्याहून:- 
लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्‍या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो, तेथून ३ ते ४ किमी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून जीपने जाता येते. मात्र जीपचे भाडे १००० रु आहे.(पण कोणत्याही गाड़ी ने जाण्या एवजी चालत जाण्याचा मार्ग पकड़वा )


































No comments:

Post a Comment